आईची कामे

शिक्षण विवेक    10-Mar-2025
Total Views |


aaichi kame

सारखंसारखं लॅपटॉपमध्ये काय गं असते आई

संपणार कधी कामं तुझी कधी संपेल घाई?

 

सकाळी मी उठते तेव्हा किचनमध्ये दिसतेस

फोनवरून बोलतबोलत कामे करत असतेस

 

सूर्य दमून गेला घरी, तू दमलीच नाही

संपणार कधी कामं तुझी कधी संपेल घाई?

 

एक्सेल, चार्ट, पीपीटीची नुसती चालू गडबड

झूम, मीट, वेबएक्सवर सदा सुरू बडबड

 

तरी तुझ्या चेहऱ्यावर थकवा कसा नाही

संपणार कधी कामं तुझी कधी संपेल घाई?

 

माझ्यासाठी डब्यात देतेस गंमत रोज नवी

प्रोजेक्टमध्ये माझ्या मला तुझी मदत हवी

 

सगळं कसं लक्षात ठेवतेस, विसरत नाहीस काही

संपणार कधी कामं तुझी कधी संपेल घाई?

 

जादूची एक छडी बाप्पा आईकडे देतो

तुझे हसणे सगळा थकवा पळवून दूर नेतो

 

जमेल तुला सगळे जेव्हा तूही होशील आई

तेव्हाच संपतील कामं माझी आणि संपेल घाई

 
- तन्मयी रानडे