Enter your Email Address to subscribe to our newsletters
गोरा गोरा एक ससा
रडत होता ढसाढसा
रडून डोळे झाले लाल
बिचाऱ्याचे नुसते हाल
ससे भाऊ होतंय काय?
मला जरा सांगता काय
गुबगुबीत तुमचं पोट
किती सुंदर तुमचे कान
काळजी घ्यायला हिरवं रान
सांगा मग दुखतं काय ?
वेड्यासारखे रडता काय ?
माझ्याकडे बघा जरा
तुमच्यापेक्षा मी बरा
खाऊन पिऊन आहे सुखी
कधी नाही पोटदुखी
एक सांगतो ससेभाऊ
इतके नका रडत जाऊ
तेलकट तिखट नका खाऊ
खूप टीव्ही नका पाहू
नाहीतर चष्मा लागेल बरं का
अगदी असा माझ्यासारखा !!
।। संगीता बर्वे ।।