इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न!

शिक्षण विवेक    01-Jul-2025
Total Views |


छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण

छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण

ज्ञानमंदिर हायस्कूल ,कोळसेवाडी,गणेशवाडी, कल्याण (पूर्व)

शालांत परीक्षा 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न करून त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच सेवा सहयोग फाउंडेशन मार्फत मोफत दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

दि.२८जून २०२५ सकाळी ११.०० वा सदर कार्यक्रम घेण्यात आला. इ. १० वी शाळेचा एकुण निकाल ८७.८७% निकाल लागला. यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील येथोचीत असा गुणगौरव करण्यात आला. तसेच सेवा सहयोग फाऊंडेशन या सामाजिक संस्थेकडून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

SNDT कॉलेज च्या समन्वयक आदिती चौधरी मॅडम यांच्या हस्ते इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राहुल भालेराव सर हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. सदरहू प्रसंगी पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक विभाग शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गवारी मॅडम, आहिरे मॅडम व गुजराथी मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. तर चौरे सर, वंजारे सर, शिर्के मॅडम यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

SNDT कॉलेज च्या समन्वयक आदिती चौधरी मॅडम यांच्या हस्ते इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सर्व पालक प्रतिनिधि उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका परदेशी मॅडम यांनी केले असून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.