रमणबाग शाळेत शालांत परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ

शिक्षण विवेक    05-Jul-2025
Total Views |


रमणबाग शाळेत शालांत परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ 

रमणबाग शाळेत शालांत परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ 

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ दहावी शालांत परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रशालेचे माजी विद्यार्थी आदित्य देशपांडेशाला समिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर,माजी मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाईप्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

'तुमच्यासारखाच मी या शाळेचा विद्यार्थी होतो आणि समोर बसून कार्यक्रम बघायचो,ऐकायचो. शाळेत असतानाच मी व्यावसायिक व्हायचं ठरवलं होतं आणि त्या दृष्टीने मी एम्.बी.ए. करायचं ठरवलं. या शाळेवर माझं खूप प्रेम आहे.मला व्यवसायाची बीजं या शाळेतूनच मिळाली आहेत.जे करायचंय त्याचा ध्यास घ्या आणि पुढील दहा-पंधरा वर्ष त्याच्यावर काम करा.मी या शाळेत क्रीडा, कला, नाटक, गाणं सगळं काही केलं आणि आता एका यशाच्या प्रगतीपथावर स्थिरावलो आहे याची धन्यता वाटते."असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ;शाळेचे माजी विद्यार्थी आदित्य देशपांडे यांनी दहावी गुणगौरव समारंभात केले.

शालासमिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर सरांनी शालांत परीक्षेत मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता भोसले आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या,"पाचवी ते दहावी तुम्ही घेतलेले परिश्रम तसेच तुमच्यावर शिक्षकांनी व पालकांनी घेतलेली मेहनत याचे फलित म्हणजे तुमचे आजचे सुयश आहे. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना 100% निकाल लावण्यासाठी मिशन सेंचुरी हे गोल दिले होते त्यामुळेच शाळेचा शालांत परीक्षेचा ९९.७५ इतका लागला आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गानू यांनी केले,पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन दीपाली सावंत यांनी केले,प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा जक्का यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर यांनी केले. फलक लेखन अंजली मालुसरे यांनी केले. व्यासपीठावर शाळेचे उपमुख्याध्यापक जयंत टोले,पर्यवेक्षिका अंजली गोरे उपस्थित होते.