डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन आणि क्रांतिदिन गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे विधीज्ञ माधव सोमण, प्रशालेचे वित्तनियंत्रक डॉक्टर विनयकुमार आचार्य, शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर मुख्याध्यापक अनिता भोसले व पदाधिकारी यांच्या हस्ते संस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर, महादेव नामजोशी, प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज आणि प्रथम कार्यवाह वामन शिवराम आपटे या पंचायतनांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
त्यांच्या कार्याची माहिती दिनविशेष विभाग प्रमुख राधिका देशपांडे यांनी चिंतनातून विद्यार्थ्यांना करुन दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक अनिता भोसले यांनी डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या थोर संस्थापकांचा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक होण्याचा प्रयत्न करावा, असे विद्यार्थ्यांना सांगितले.
प्रमुख पाहुणे विधीज्ञ माधव सोमण यांनी विद्यार्थ्यांना देशाचे व शाळेचे नाव उज्वल करा असा संदेश दिला.
शाळासमिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर यांनी वाहतुकीचे नियम पाळा, शालेय शिस्त पाळा, अपशब्द बोलू नका, गुरुजन व पालक यांचा आदर राखा, मोबाईलचा अतिरेक टाळा, या पंचसूत्रीचा विद्यार्थ्यांनी अवलंब करावा असे मार्गदर्शन केले.
संस्थापक दिनाच्या निमित्ताने
शैक्षणिक ,सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थी, मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा जक्का उपस्थित होते.
रक्षाबंधनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी
एकमेकांना राखी बांधली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक बीजराख्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाडांना बांधल्या. तसेच स्वच्छता दूत व सुरक्षारक्षक, रिक्षा व व्हॅनवाले काका यांना नववीतील विद्यार्थ्यांनी राखी बांधली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पाठक यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय वर्षा गानू यांनी करून दिला, गुणवंत विद्यार्थ्यांची नावे अनघा काकतकर यांनी वाचली तर ऋणनिर्देश पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर यांनी करुन दिला.