रमणबाग प्रशालेमध्ये आंतरवर्गीय वक्तृत्वस्पर्धा बक्षीस वितरण समारंभ

शिक्षण विवेक    22-Aug-2025
Total Views |

रमणबाग प्रशालेमध्ये आंतरवर्गीय वक्तृत्वस्पर्धा बक्षीस वितरण समारंभ
 
शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी रमणबाग प्रशालेमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख अतिथी व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यानिमित्त २३ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आंतरवर्गीय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी व शाहीर होनराज हेमंतराजे मावळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक अनिता भोसले यांनी प्रास्ताविकात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या थोर व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती सांगितली. प्रमुख अतिथी होनराज हेमंतराजे मावळे यांनी वक्तृत्व कला म्हणजे नेमके काय, याविषयी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शिक्षिका वैशाली भोकरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती सांगितली. शाळेतील विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित गीत सादरीकरण केले.
शौर्य कदम, तेजस कवितके, अथर्व यावलकर या क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची भाषणे यावेळी सादर झाली.
पाहुण्यांचा परिचय अर्चना देवळणकर यांनी करून दिला. यावेळी उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षिका मंजूषा शेलूकर व अंजली गोरे उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण रवींद्र सातपुते, शैलेश नागवडे यांनी केले. गणेश देशमुख यांनी सूत्रसंचालन व दिपाली चौघुले यांनी आभार प्रदर्शन केले. दिनविशेष प्रमुख राधिका देशपांडे व वक्तृत्व विभाग प्रमुख सुनीता खरात यांनी नियोजन केले.