एच.ए. स्कूल प्राथमिक विभागात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली

शिक्षण विवेक    22-Aug-2025
Total Views |

एच.ए. स्कूल प्राथमिक विभागात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली
 
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागात आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुरेखा आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे व डॉक्टर विठ्ठल मोरे यांनी दोघांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून पूजन केले. इयत्ता पहिलीतील विराज धनावडे हा विद्यार्थी लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत तर आरव भालेराव हा विद्यार्थी अण्णाभाऊ साठे यांच्या वेशात आला होता. अनघा कडू यांनी दोघांविषयी माहिती सांगितली. असे होते आमचे टिळक आजोबा ...हे गाणे साभिनय सादर केले. इयत्ता चौथीच्या रक्षा अंबाडे या विद्यार्थिनीने अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्यावरील गाणे सादर केले. लोकमान्य टिळक यांचे पणतू , टिळक महाराष्ट्र विद्यापीठ चे कुलगुरू डॉक्टर दिपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शुभांगी गवारी यांनी सूत्रसंचालन केले व पुष्पा राऊत यांनी आभार मानले.
शब्दांकन
सौ शहनाझ हेब्बाळकर