अध्यक्ष राजीव पंडित यांचे सर्प विज्ञान याविषयी व्याख्यान.

शिक्षण विवेक    22-Aug-2025
Total Views |
 
अध्यक्ष राजीव पंडित यांचे सर्प विज्ञान याविषयी व्याख्यान.
 
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत नागपंचमी निमित्त जीविधा संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित यांचे सर्प विज्ञान याविषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विज्ञान शिक्षक हेमंत पाठक यांनी राजीव पंडित यांचा परिचय करुन दिला तर प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता भोसले यांनी राजीव पंडित यांंचे स्वागत गुलाबाचे रोप व पुस्तक देऊन केले. यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक जयंत टोले पर्यवेक्षिका अंजली गोरे व मंजूषा शेलूकर उपस्थित होते. राजीव पंडित यांनी विद्यार्थ्यांना सापांच्या विविध प्रजाती विषयी शास्त्रीय माहिती दिली. उंदीर दहा टक्के अन्नधान्य साठा नष्ट करतात त्यासाठी सापांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले. पर्यावरण विभाग प्रमुख सविता कदम यांनी आभार मानले.