दिनांक ३ सप्टेंबर २०२५
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागात आज अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून प्रत्येक इयत्तेला वेगवेगळे विषय देण्यात आले. यामध्ये बालवर्गासाठी नृत्य, इयत्ता पहिलीसाठी रंगभरण, इयत्ता दुसरी साठी गणपती स्तोत्र पाठांतर, इयत्ता तिसरी साठी गणपतीची मूर्ती बनविणे व इयत्ता चौथीसाठी विविध गुणदर्शन हे विषय देण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी या रे या सारे या, अशी चिकमोत्याची माळ, देवा श्री गणेशा, आया रे आया देखो बाप्पा मोरया अशा श्री गणेशाच्या विविध गाण्यांवर नृत्य व लेझीम सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, विठ्ठल मोरे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. अशा प्रमाणे अतिशय उत्साही वातावरणात विविध कार्यक्रम सादर करून श्री गणेश बाप्पांना आम्हाला चांगली बुद्धी दे चांगलं स्वास्थ्य दे, चांगलं आरोग्य दे, सर्वांना सुखी ठेव अशी बाप्पा चरणी प्रार्थना करण्यात आली.
वार्तांकन
सौ. शहनाझ हेब्बाळकर