हुजूरपागा करंडक कला स्पर्धेत म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी समूहगीत स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक

हुजूरपागा करंडक कला स्पर्धेत म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी समूहगीत स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक

शिक्षण विवेक    16-Sep-2025
Total Views |
 
हुजूरपागा करंडक कला स्पर्धेत म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी समूहगीत स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक
हुजूरपागा करंडक कला स्पर्धेत म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी समूहगीत स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक
हुजूरपागा करंडक कला स्पर्धेत यंदा रंगतदार सादरीकरणे झाली. शिक्षक समूहगीत स्पर्धेत म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपल्या सुरेल गायनाने तृतीय क्रमांक पटकावला. “वेडात मराठे वीर दौडले सात” या गीताच्या समूहगायनाला प्रेक्षकांची दाद मिळाली. शिक्षकांनी एकजुटीने केलेल्या या सादरीकरणातून परिश्रम, निष्ठा आणि कलाप्रेम दिसून आले.या शिक्षकांना गायन शिक्षिका आदिती आठवले यांनी मार्गदर्शन केले होते .
या यशाबद्दल शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड आणि उपमुख्याध्यापिका वृषाली ठकार यांनी सहभागी शिक्षकांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनीही कलेतून सहभाग नोंदवून शाळेचे नाव अभिमानाने उंचावले आहे.”
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांना पालक, शिक्षक ,विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्याकडूनही मनःपूर्वक शुभेच्छा मिळाल्या .