दिनांक 17 सप्टेंबर 2025
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत आज भारताचे लाडके, यशस्वी पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा 75 वा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. यामध्ये बालवर्गापासून ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डवर पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहिल्या. तसेच स्वतःचा वर्ग, वर्गाचा परिसर स्वतःच्या हाताने स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबविले. तसेच यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता व पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता व पर्यावरण हा गाभा धरून यावर आधारित चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक मंडळाने केले.
वार्तांकन
सौ शहनाझ हेब्बाळकर