डी.ई.एस.च्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती
★विविध कार्यक्रम ★
पुणे: आज दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त डी.ई.एस.च्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व सेकंडरी माध्यमिक शाळेच्या वतीने ‘स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा ’अभियानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
डी.ई.एस.च्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपकार्यवाह दीपक काळे, सांस्कृतिक विभागाचे मिलिंद कांबळे, प्री-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे,माधव सदाशिव गोळवलकर गुरुजींच्या पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद लागू, माध्यमिक विभागाच्या वासंती बनकर, डी.ई.एस.सेकंडरी शाळेच्या उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी,पर्यवेक्षिका ग्रेसी डिसूजा, सिमरन गुजर, काजल चौधरी, विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते. डी.ई.एस.च्या पूर्व प्राथमिक व माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या शाळेत झालेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थित होते.
प्रारंभी सरस्वती देवीचे पूजन करण्यात आले. घोष पथकाच्या वादनात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर मोदीजींची वेशभूषा परिधान केलेल्या मुलासहित मान्यवर उपस्थित होते. संगीत शिक्षिका हर्षदा कारेकर यांनी मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त गीताचे गायन केले. योगिनी कानडे यांनी ‘मोदीजीं का सपना, स्वच्छ भारत अपना’ असा विद्यार्थ्यांसहित नारा दिला. गौरी देवळणकर यांनी ‘ स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा’ प्रतिज्ञाचे वाचन केले.उपस्थित विद्यार्थी शिक्षक, शिक्षकांनी प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी आमदार हेमंत रासने यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त होत असलेल्या स्वच्छता अभियाना संदर्भात माहिती देऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा पत्रे तयार केली. याप्रसंगी स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा’माहिती पुस्तिकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी कानडे यांनी केले. प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींच्या घोष पथकाने वादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.ई.एस.च्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षिकांनी परिश्रम घेतले.
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक डी. ई.एस. सेकंडरी स्कूल, टिळक मार्ग, पुणे.