अष्टदुर्गा सत्कार!

शिक्षण विवेक    26-Sep-2025
Total Views |

अष्टदुर्गा सत्कार!
अष्टदुर्गा सत्कार!
नवदुर्गा म्हणजे देवी दुर्गेची नऊ रूपे आहेत, ज्यांची पूजा नवरात्रीला केली जाते. नवरात्री निमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्या. रानडे बालक मंदिरा मध्ये २५/९/२०२५ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या उच्च पदावर कार्यरत असलेल्या G.B. सेक्रेटरी स्वाती जोगळेकर, आजीव सदस्या प्राजक्ता प्रधान, कौन्सिल मेंबर डॉ. प्रीती अभ्यंकर, नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव, मातृमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, गोळवलकर गुरुजी शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने, NEMS पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी व NEMS शाळेच्या प्राथमिकच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख या आठ दुर्गारूपी महिलांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भार्गवी फडके ह्यांनी केले व आभाराचे गोड काम ऋचा जोशी ह्यांनी केले.
शालासमिती अध्यक्ष राजेंद्र जोग व शाळेच्या मुख्याध्यापिका अमिता दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षिकांनी व शिक्षकेतर कर्मचार्यांनी याचे आयोजन केले.