सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात, आनंदात व जल्लोषात पार पडले.

शिक्षण विवेक    19-Jan-2026
Total Views |
mes annual day
 
वार्षिक स्नेहसंमेलन
      महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत दिनांक 17 जानेवारी २०२६, वार शनिवार रोजी प्रशालेच्या मैदानावर वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात, आनंदात व जल्लोषात पार पडले.
      या वर्षीच्या स्नेहसंमेलनाचा विषय “भारतीय सण आणि उत्सव” असा होता. या विषयानुसार विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमात सांघिक नृत्य, सोलो नृत्य, नाट्यप्रयोग तसेच ‘मूल्य जपणे’ या विषयावर आधारित नाटक सादर करण्यात आले. प्रत्येक सादरीकरणातून भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांचे महत्व, परंपरा आणि सामाजिक मूल्ये प्रभावीपणे मांडण्यात आली.
      स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उत्तम व्यासपीठ असल्याचे या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभाग घेत आपली कला सादर केली.
      या कार्यक्रमाला प्रशालेचे महामात्र डॉ. निर्भय पिंपळे सर,मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ सर, उपमुख्याध्यापिका सुनीता गायकवाड मॅडम,पर्यवेक्षिका सौ. जयश्री शिंदे मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक , माजी विद्यार्थी तसेच प्रशालेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका सौ. नलिनी पवार व सौ. अपर्णा भणगे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. जयश्री शिंदे मॅडम यांनी मानले.
      वार्षिक स्नेहसंमेलन आनंददायी वातावरणात, शिस्तबद्ध नियोजनाने व उत्साहात यशस्वीरीत्या पार पडले.