एच. ए .स्कूल प्राथमिक विभागात आज अवतरली क्रांतीज्योती सावित्रीबाई !

शिक्षण विवेक    06-Jan-2026
Total Views |
ha school
शालेय उपक्रम
दिनांक 3 जानेवारी 2026
   डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे बालिका दिन साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील प्रसंगांचे नाट्यीकरण करून दाखविले. शहनाझ हेब्बाळकर यांनी नाटकाचे लेखन केले होते. यासाठी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत स्वरा टाकळकर व महात्मा फुले यांच्या वेशभूषेत हार्दिक नाईक आले होते. अवनी चवले हिने बालिका दिनाची माहिती सांगितली. रक्षा अंबाडे हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील सुंदर गाणे गायले. तसेच इयत्ता चौथीच्या शिक्षिका राजश्री भालेराव यांनी मी सावित्री बोलते..... हा एकपात्री प्रयोग सादर केला. यामध्ये त्यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीने आजच्या जमान्यातील विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या सुधारणा सांगितल्या . शहनाझ हेब्बाळकर यांनी सूत्रसंचालन केले. व गीतमंचाच्या अनिता येनगुल ,अनघा कडू व समीक्षा इसवे यांनी सावित्रीबाई वरील समीक्षा इसवे यांनी लिहिलेले गाणे सादर केले. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी मुलांना आपल्या घरातील किंवा परिसरातील एकातरी असाक्षर व्यक्तीला साक्षर बनवण्याचा उपक्रम मुलांना दिला. संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले.
सौ. शहनाझ हेब्बाळकर