महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या हस्ते महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची व देशसेवेतील योगदानाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ‘मिठाचा सत्याग्रह’ या ऐतिहासिक घटनेचे प्रभावी नाट्यीकरण सादर केले. यावेळी विद्यार्थी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या वेशभूषेत उपस्थित होते.
तसेच इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश प्रभावीपणे दिला.
यानंतर विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणांसह स्वच्छतेचा संदेश देणारी प्रभातफेरी काढली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, देशप्रेम, सत्य, अहिंसा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांची जाणीव निर्माण झाली.
या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा उत्साह, सहभाग आणि सादरीकरण पाहून शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
अशा विविध उपक्रमांमधून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा व कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला.