'केशवराज' मध्ये शिक्षण विवेक ऑक्टोंबर २०२६ महिन्यातील अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

शिक्षण विवेक    12-Oct-2026
Total Views |
bsps
लातूर: दि.१०/१०/२०२६ वार शनिवार रोजी श्री केशवराज विद्यालय,लातूर येथे शिक्षणविवेक ऑक्टोंबर महिन्यातील अंकाचे प्रकाशन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री धनंजय कुलकर्णी, पर्यवेक्षिका श्रीमती इंदू ठाकूर मॅडम अभ्यास पूरक मंडळ प्रमुख श्रीमती सुनिता बनसोडे, परिपाठ प्रमुख श्रीमती अर्चना ठोंबरे श्रीमती सारिका चद्दे शिक्षणविवेक प्रमुख स्मिता मेहकरकर,विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले. या महिन्याच्या अंकात कु. श्रद्धा येळीकर (१० वी) लहानपणी वाटायचं कविता, कु. प्रतीक्षा जाधव( ९वी), हर्षदा जाधव ,शिक्षक कविता( ५वी कु. प्राची पटणे(७वी) चित्र कुमारी ईश्वरी शितोळे, आजोबांची जादूची काठी (७वी) कु. ऋतुजा गोबाडे (६वी) कुमारी यशश्री चव्हाण (६वी) चित्र हे साहित्य प्रकाशित झाले आहे. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.