डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित एच्.ए.स्कूल पूर्व प्राथमिक विभागात म.गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
माननीय मुख्याध्यापिका सौ. तनुजा तिकोने मिस यांच्या हस्ते म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक सौ.अर्चना गोरे, श्री.डॉ.मोरे सर व सौ.धनश्री पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शालासमिती अध्यक्ष मा. खेमराज रणपिसे सरांनी शुभेच्छा दिल्या.
रघुपती राघव राजाराम या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.बनी टमटोला या उपक्रमातील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या गाण्यावर छान अभिनय करून म.गांधीजी यांचा संदेश दिला.
सौ. मनिषा भिसे व सौ.वैशाली निचित यांनी म. गांधीजी व लाल बहादूर यांची माहिती व गोष्ट सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्पणिका कदम यांनी केले.