अहिल्यानगर येथील रेणावीकर विद्या मंदिरात नवरात्रीनिमित्त सर्व माता पालकांना सशक्त बनविण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा यातील सदस्यांनी येऊन ग्राहक संरक्षण कायदा विषयी सखोल माहिती दिली.
तसेच तक्रार कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी श्री. तेजस गायकवाड यांनी आर्थिक साक्षरता आणि सायबर सिक्युरिटी याविषयी माता पालकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. गराडे यांनी शून्य कचरा कसा करावा याबाबत मार्गदर्शन आणि काही प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर माता पालकांचा सर्व शिक्षकांसह भोंडला सादर झाला. पारंपारिक गाणी गात सर्वांनी फेर धरत उत्कृष्ट भोंडला साजरा झाला.
यावेळी पालकांना अल्पोपहारही देण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माता पालकांसाठी या सर्व गोष्टींचे आयोजन करण्यात आले होते.