वाचन प्रेरणा दिन

शिक्षण विवेक    17-Oct-2026
Total Views |
mes

 माजी राष्ट्रपती महान वैज्ञानिक आणि मिसाईल मॅन म्हणून ओळख प्रस्थापित केलेले विद्यार्थी प्रिय शिक्षक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून रेणावीकर विद्यालयात अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा झाला.
अनेकविध वाचनाचे उपक्रम शिक्षकांनी राबवून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचनाची गोडी रुजवली.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मैदानावर *वाचन दिन* अशी आकृती साकारली.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर आधारित कथाकथन उपक्रमातून प्रभावी सादरीकरण केले. तसेच पुस्तके वाचण्याची शपथ घेतली.
सौ. गराडे यांनी वाचनाचे महत्त्व विशद करून व्यक्तीला शहाणे करण्याचे पारंपारिक 4 मार्ग सांगितले.
इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करून वाचन दिन साजरा केला.
माननीय मुख्याध्यापिका सौ प्रतिभा गायकवाड यांच्या प्रेरक मार्गदर्शनातून शिक्षकांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आणि विद्यार्थ्यांचा त्याला उत्साही प्रतिसाद मिळाला.