राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : जबाबदार पालकत्व’ विषयावर पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान

शिक्षण विवेक    17-Oct-2026
Total Views |
des
सातारा : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा, सातारा येथे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्व पालकांसाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : जबाबदार पालकत्व’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानातून पालकत्वाची बदलती भूमिका, मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची जबाबदारी आणि मुलांशी सुसंवादी संवादाचे महत्त्व याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाला व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. माधुरी नेर्लेकर यांनी सूत्रसंचालन, स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख वक्ते श्री. विरेन शरदभाई जानी यांनी पालकांशी संवाद साधताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने जबाबदार पालकत्वाचे विविध पैलू अत्यंत प्रभावीपणे मांडले.
आजच्या डिजिटल युगात मुलांना डिजिटल डिटॉक्स, सायबर सुरक्षितता आणि स्क्रीन टाइमचे योग्य नियोजन याबाबत जागरूक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मुलांच्या आरोग्यासाठी योग्य पोषण, संतुलित आहार, कौशल्यविकास आणि सर्वांगीण विकासाकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी मा.शालाप्रमुख श्री. धनंजय तळपे यांनी पालकांशी संवाद साधत शाळा आणि पालक यांच्यातील सुसंवादातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मनिषा चव्हाण यांनी आभार मानले. पालकांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शनपर विचारांचे स्वागत केले.