खंडेनवमी व दसऱ्यानिमित्त शाळेत वाद्यपूजनासह,ज्ञानसाधनांचे पूजन

शिक्षण विवेक    21-Oct-2026
Total Views |
des
पुणे, दि.१९ ऑक्टोबर : खंडेनवमी व दसऱ्याचे औचित्य साधून शनिवार पेठेतील एन.ई.एम.एस शाळेमध्ये पारंपारिक उत्साहात व भक्तिभावाने विविध ज्ञानसाधनांचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील संगीत विभागातील विविध वाद्यांचे तसेच शैक्षणिक साहित्य,पुस्तके,डिजिटल साहित्य, लॅपटॉप आणि खेळाच्या साहित्याचे पूजन मा.मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देवीच्या श्लोकाचे सामूहिक पठण केले.
विद्यादानाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या साधनांविषयी,वाद्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या परंपरेची ओळख होण्याबरोबरच शालेय साहित्याचा योग्य वापर, जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा मिळाली.
इयत्ता १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी वर्गावर्गात सरस्वती पूजन ,पाटी पूजन केले व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झेंडूच्या फुलांचे सुंदर तोरण तयार केले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्यांचा विकास झाला.