म. ए. सो.बाल शिक्षण मंदिर डेक्कन जिमखाना पुणे - शाळेचा वाढदिवस

ही आवडते मज मनापासून शाळा लावीते लळा ही जशी माऊली बाळा

शिक्षण विवेक    29-Oct-2026
Total Views |
mes

 गुरुवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी शाळेचा १०५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्रथम मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळेस इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व म. ए. सो. गीत सादर केले .
आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी गीता मालुसरे हिला 'ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राऊन' बहुमान मिळाला. ही जागतिक कामगिरी करणारी भारतातील पहिली महिला जलतरणपटू आहे.देशासाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे. शाळेच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिच्या या यशाप्रीत्यर्थ आज शाळेत तिचा सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या. शालामातेकडून झालेल्या या सत्काराने सर्वजण खूपच भारावून गेले.
शाळेच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली व शाळेला शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त पौष्टिक खाद्य बियांचा खाऊ मुलांना दिला. त्यामुळे सर्व विद्यार्थी खूपच आनंदित होते.
कार्यक्रमात सुरुवातीला मा.मुख्याध्यापिका खेडलेकर बाई यांनी प्रास्ताविक केले. शाला समितीच्या अध्यक्षा मा. मैत्रीयीदेसाई यांनी शाळेच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षिका सौ. सुरेखा कांबळे यांनी शाळेच्या इतिहासाची माहिती सांगितली.
सौ. रोहिणी पवार बाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमासाठी शाला समितीच्या अध्यक्षा मा. मैत्रेयी देसाई, शाळेच्या महामात्र डॉ. अश्विनी पाटील, मा. मुख्याध्यापिका सौ. खेडलेकर तसेच सर्व शिक्षक, सत्कारमूर्ती माजी विद्यार्थिनी कुमारी गीता मालुसरे व तिचे आप्तस्वकीय, हितचिंतक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
अशा प्रकारे खूपच आनंदी व उत्साही वातावरणात शाळेचा १०५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.