एच्. ए. स्कूल प्राथमिक व पूर्व प्रा. विभागात पालकांसाठी व्याख्यान

शिक्षण विवेक    29-Oct-2026
Total Views |
des

दि. २८ ऑक्टोबर २०२६ डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक व पूर्व प्रा.विभागात मा.श्री. सदाशिव सिताराम उपाले, शिशू शिक्षण तज्ञ यांचे नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण ( NEP) या विषयावर पालकांसाठी उद्बोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानाची सुरुवात मा. सदाशिव उपाले, मुख्याध्यापिका तनुजा तिकोने , ज्येष्ठ शिक्षिका अर्चना गोरे व धनश्री पाटील यांच्या हस्ते
सरस्वती पूजन व प्रार्थनेने करण्यात आली.
मुलांचा सर्वांगीण विकास
घडवून आणणे. शिक्षणाबरोबरच मुलांमध्ये संस्कार व मूल्यांची शिकवण रूजवली जावी.तसेच
विविध कृतीच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण आनंददायी व संस्कारक्षम व्हावे हाच या व्याख्यानाचा उद्देश होता.
या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शाला व्यवस्थापन समितीचे श्री. दिवटे व सौ.संभूस उपस्थित होते.
शेहनाज हेब्बाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या व्याख्यानासाठी शालासमितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे यांचे मार्गदर्शन लाभले.
व्याख्यानासाठी मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.
वार्तांकन
शामला दाभाडे