डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत आज द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांचे उत्साह पूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका तनुजा तिकोने यांनी प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले यावेळी ढोल ताशाच्या गजरात व फुलांच्या वर्षावात मुलांचे आनंदाने स्वागत करण्यात आले. तसेच वर्गात वर्गशिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण केले व विविध गमतीशीर खेळ , आनंददायी अभ्यास घेऊन आज चा दिवस मनोरंजनात घालविण्यात आला. शालेय पोषण आहारा तर्फे मुलांना आज गोड शिरा देण्यात आला. सरस्वती वंदना व दीप प्रज्वलनाने द्वितीय सत्राची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री भालेराव यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी जेष्ठ शिक्षिका अर्चना गोरे यांनी मार्गदर्शन केले. शाला समितीचे अध्यक्ष श्री खेमराज रणपिसे यांनी द्वितीय सत्रासाठी सर्व मुलांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
वार्तांकन
शहनाझ हेब्बाळकर