दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून एन् ई एम् एस् शाळेत इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही सत्रांत ‘स... संविधानाचा’ या बालनाट्याचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची ओळख व्हावी, संविधानातील मूलभूत मूल्ये, हक्क, कर्तव्ये, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे महत्त्व समजावे, हा या बालनाट्याचा मुख्य उद्देश होता.
या बालनाट्याचे दिग्दर्शन देवेंद्र भिडे यांनी केले. त्यांनी बाबांची भूमिकाही साकारली. तसेच अश्विनी थोरात यांनी आईची, अनुपमा जोशी यांनी आजीची, रमणी देशपांडे यांनी मंजिरी (बहीण) यांची, तर आर्चिस थत्ते यांनी वरद (भाऊ) यांची भूमिका साकारली.
शिक्षणविवेकतर्फे निर्मित या बालनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती मनोरंजक व प्रभावी पद्धतीने अनुभवता आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास तसेच लोकशाही मूल्ये, हक्क आणि कर्तव्यांविषयीची जाणीव दृढ होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका अनघा पोळेकर यांनी केले. आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक प्रसाद लागू यांनी केले.