जाणिवेच्या पारावर
प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल, सानपाडा शाळेत दिनांक 3 नोव्हेंबर 2026 रोजी *एक दीप जाणिवेचा* या उपक्रमा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पालकांना , एकल पालकांना तसेच शाळेतील स्वच्छता कर्मचारी ह्यांना दिवाळी फराळासाठी लागणारे जिन्नस ( तेल, चणाडाळ, रवा,साखर इ .)पणती ,आकाशकंदील देण्यात आले. गटागटाने घरोघरी जाऊन,पालकांची विचारपूस करून त्यांना मानसिक आधार दिला. त्यांच्या व्यथा अडचणी समजावून घेतल्या. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.ऋतुजा गवस मॅडम व शिक्षक वृंद यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंदाने दिवाळी साजरा करण्याचा संदेश दिला..
तसेच दिवाळी निमित्ताने इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी फुलांची रांगोळी, पणती रंगवणे सजावट, रांगोळी काढणे लिंबू फळवर्ग सालीपासून स्वच्छता द्रावक बायो enziem बनवणे, व्यवसायिकास भेट अंतर्गत कार्पेटर दडलं दादाला सुतार काम करणारा दादांना भेट ,लाकडी काम कसे होते विद्यार्थ्यांनी समजून घेतले,आकाश कंदील, कागदी पुष्पगुच्छ, सुगंधी उटणे विद्यार्थ्यांनी शिक्षक,मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले.पाणी बचत,प्रदूषण विरहित आरोग्यमय दिवाळी साजरा करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
शुभ दीपावली 🪔