म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत दीपोत्सव उत्साहात साजरा!

शिक्षण विवेक    09-Nov-2026
Total Views |

mes
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळा, पुणे ३० येथे दिव्यांची मनमोहक रोषणाई करून दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या शुभहस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले.
या दीपोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेले आकर्षक आकाशकंदील! विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विविध प्रकारचे सुंदर आकाशकंदील तयार केले होते व स्वतः रंगांच्या सहाय्याने पणत्या रंगवल्या . शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिवाळी या सणाचे महत्त्व सांगून वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व भाऊबीज या सणांची माहिती प्रतिकात्मक उभारणी करून दिली .
शाळेच्या आवारात प्रत्येक वर्गासमोर विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी फुलांपासून सुंदर रांगोळ्या साकारल्या. आकर्षक आकाशकंदील, दिव्यांची मनमोहक रोषणाई आणि शाळेचे नाव दिव्यांच्या साहाय्याने साकारून केलेली सजावट यामुळे संपूर्ण शाळेचा परिसर प्रकाशमय आणि प्रसन्न झाला होता.
विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. फटाके न वाजवता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करूया आणि निसर्गाचे रक्षण करूया, असा मोलाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी यावेळी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली . स्वतः दिवाळीचा शुभेच्छा संदेश देणारे भेटकार्ड बनवले व त्यातून प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा व स्वच्छतेचा संदेश दिला .
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, त्यांची कल्पकता आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे दीपोत्सव अधिकच सुंदर आणि संस्मरणीय ठरला.
या सुंदर आयोजनाबद्दल
शाला समिती अध्यक्ष डॉ . दिलीप शेठ ,महामात्रा डॉ .मानसी भाटे , मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक केले .
अशा आनंददायी उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!