दिनांक : 9 फेब्रुवारी 2026
वार : सोमवार
रोजी प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा शाळेत जीवन अनुभव देणारा *आनंद मेळावा* आयोजित करण्यात आला. शालेय शिक्षणाचे उपयोजन करण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांचा विकास होण्यास मदत झाली. स्वतःच्या उत्पादनाची जाहिरात करणे विक्री व्यवस्था उभी करणे. त्याचे नियोजन करणे हिशोब ठेवणे सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करणे या सर्व बारीक सारीक गोष्टींचे शिक्षण यामधून विद्यार्थ्यांना मिळाले.
इयत्ता 6वी आणि 7वी या मुलांनी यामध्ये सहभाग घेतला. इयत्ता 1 ली ते 4 थी च्या पालकांनी ही आपले खाद्य पदार्थचे स्टॉल मांडले होते.
आनंद मेळाव्या च्या उदघाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून सौ.पूजा पाटील मॅडम, केंद्र समन्वयक ,तसेच श्री परमेश्वर चौधरी सर सेवानिवृत्त शिक्षक यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री वाव्हळ सर यांनी मुलांना गोष्टीतून महत्त्व पटवून दिले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .ऋतुजा गवस मॅडम यांच्या कल्पनेतून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सो मानकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या खाद्यपदार्थांची मांडणी केली होती, यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ होते, जसे पाणीपुरी शेवपुरी, भेळ, त्याचप्रमाणे मोदक, थालीपीठ धपाटे ,घावणे ,पुलाव, पोहे, मका भेळ, तसेच पिण्यासाठी कोकम सरबत ,कैरीचे पन्हे,कॉफी,सरबत इत्यादी पन्नास च्या वर प्रकार मांडले होते, मुलांनी स्वच्छता,व्यवहार,
आर्थिक गणित,व्यवसाय,संवाद, संभाषण,नियोजन सर्वच प्रकारच्या गोष्टीचे खूप व्यवस्थित अभ्यास करून सहभाग घेतला. जमवलेल्या पैशातून बँकेत विद्यार्थ्यांचे बचत अकाउंट काढून त्यांना बचतीची सवय, बँकेचे व्यवहार यांचेही अनौपचारिक रित्या शिक्षण मिळणार.. शिक्षक,विद्यार्थी,आपले पालक सर्वांनी आनंद मेळाव्यात उत्साहाने आनंद घेतला.