पुणे : डी.ई.एस.सेकंडरी स्कूल शाळेला वनराई संस्थेतर्फे उत्कृष्ट गुरुबाग पुरस्कार , दुपार विभाग उत्कृष्ट पथनाट्य (द्वितीय) व उत्कृष्ट पर्यावरण चित्र अशी पारितोषिके मिळाली आहेत.
वनराईच्या वतीने पद्मविभूषण मोहन धारिया यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त वनराई इको क्लबच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, शाळांचा सत्कार गौरव कार्यक्रम दि.१४ फेब्रुवारी २०२६ रोजी टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ‘नाळ’ चित्रपटातील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते बाल कलाकार श्रीनिवास पोकळे, वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे, डॉ. विनोद शहा,सागर धारिया, सचिव अमित वाडेकर, बबनराव कानकिरड, प्रा. वसंत बंग, बसवंत विठाबाई बाबाराव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका विजया जोशी,उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, काजल चौधरी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालकांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.
शाळेला उत्कृष्ट गुरुबाग पुरस्कार, उत्कृष्ट पथनाट्य(दुपार विभाग ) द्वितीय पारितोषिक मिळाले. ‘झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत’ या पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन शिक्षिका प्राची कुलकर्णी, संगीत भक्ती पटवर्धन, कला सहकार्य नीता उंब्रजकर यांनी केले.पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रिहान जमदग्नी,चिद् घन क्षीरसागर, सार्थक साळस्कर,आशय कुलकर्णी,अभिराज देशमुख,आद्या कुलकर्णी,भाग्यश्री शिंदे,अनन्या डाबी,सई सहस्त्रबुद्धे, गार्गी निजामपूरकर यांचा समावेश आहे.
उत्कृष्ट पर्यावरण चित्रासाठी (दुपार विभाग) इयत्ता सहावीतील आलापी धोत्रे व ऋतुराज कालेकर यांना मिळाले. सकाळ विभागातील विद्यार्थ्यांनीदेखील प्रथम फेरीमध्ये पोवाड्याचे उत्तम सादरीकरण केले. पोवाडा लेखन राघवेंद्र गणेशपुरे व हर्षदा कारेकर, संगीत हर्षदा कारेकर, कला सहकार्य नीता उंब्रजकर यांनी केले. पोवाडा सादरीकरणामध्ये पार्थ जोशी( हार्मोनियम),सनत जोशी, ओम दामले, वंदन इरोळे, आदित्य चरखा, ज्ञानेश गांधी, वरद वाळिंबे (ढोलकी),अर्णव कुलकर्णी, अभ्यंग गायकवाड, सोहम देशमुख, सर्वेय देशमुख, रिया नगरकर, इरा खेडकर, आभा जोशी, अधीश पेंडसे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. सकाळ व दुपार विभागाचे समन्वयक म्हणून राघवेंद्र गणेशपुरे यांनी काम पाहिले. वनराईच्या उपक्रम, प्रकल्प, स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.