शिक्षण माझा वसा २०२६ उपक्रमशील शिक्षक पुरस्कार

शिक्षण माझा वसा २०२६ उपक्रमशील शिक्षक पुरस्कार

शिक्षण विवेक    19-Feb-2026
Total Views |
 
शिक्षण माझा वसा २०२६ उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा
शिक्षण माझा वसा २०२६ उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी फर्ग्युसन महाविद्यालयाचे अम्फी थिएटर येथे 'विवेक साहित्य मंच आयोजित विवेक युवा आणि बाल साहित्य संमेलन २०२६'मध्ये संपन्न झाला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी मा. मिलिंद कांबळे, मा. पुष्कर लेले, मा. श्रीधर देव, मा. डॉ. अर्चना कुडतरकर, मा. संजीवनी शिंत्रे, मा. ममता क्षेमकल्याणी इ. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी शिक्षकांशी संवाद साधला.
 
शिक्षण माझा वसा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार 
विशेष विभागातील पुरस्कार - महेश ठाकरे, जिल्हा परिषद शाळा जामदरी, ता नांदगाव, जि. नाशिक
गणित विषयातील पुरस्कार - रोहिणी चौधरी, नूतन मराठी विद्यालय, सोलापूर  
भाषा विषयातील पुरस्कार - मनीषा कदम, नवीन मराठी शाळा, पुणे  
 
 शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी पुरस्कार 
राघवेंद्र गणेशपुरे - डेक्कन एज्यूकेशन सोसायटी 
केशर जाधव - महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटी
अदिती साने - शिक्षण प्रसारक मंडळी 
दिपाली आकनगिरे - भारतीय शिक्षण प्रसारक मंडळी 
नंदा गायकर - छत्रपती शिक्षण मंडळ 
अदिती शेलार - महर्षी स्त्री शिक्षण संस्था 
 
उपक्रमशील मुख्याध्यापक  
कल्पना वानखेडे - महर्षी स्त्री शिक्षण संस्था