विद्यार्थी समूहगान स्पर्धेत एन.ई.एम.एस शाळेला उत्तेजनार्थ बक्षीस!

शिक्षण विवेक    21-Feb-2026
Total Views |
 
des
मातृमंदिर विश्वस्त संस्था,निगडी यांनी आयोजित केलेल्या
विद्यार्थी समूहगान स्पर्धेत पुणे विभागात आपल्या एन.ई.एम.एस शाळेला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे. तसेच पोवाडा गायन स्पर्धेत पुणे विभागातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
ही स्पर्धा शाळेच्या मैदानावर दिनांक २७ जानेवारी रोजी घेण्यात आली होती.परीक्षण करण्याकरिता मातृमंदिर संस्थेचे परीक्षक शाळेत आले व विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर समूहगीत सादर केले.
ह्या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ८वी च्या दोन्ही सत्रातील एकूण ४०० मुलांनी सहभाग घेत एकत्रित एका सुरात- तालात ' वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम
हे गीत सादर केले होते.
गीताची चाल संगीत शिक्षिका अश्विनी पटवर्धन यांची होती.
शिक्षिका अक्षदा इनामदार यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांवर आधारीत पोवाडा सादरीकरणासाठी मार्गदर्शन केले. पोवाडा गायनात एकूण १४ मुलांचा सहभाग होता.
ताल वाद्याची साथ शिक्षिका स्वाती मेहेंदळे यांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी केली होती.
शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुखाध्यापिका हेमांगी देशमुख तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक  प्रीतम जोशी सर यांचे व शाळेतील सहकारी सर्व शिक्षकांचे अभिनंदन💐💐