एच ए स्कूल प्राथमिक विभागाने विश्वम वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करून रचला इतिहास !!!

शिक्षण विवेक    24-Feb-2026
Total Views |
 
des 
अभिनंदन! अभिनंदन !!अभिनंदन!!!
 
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेतील 450 विद्यार्थ्यांनी मिळून शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून सलग दोन तास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जीवनपट दाखवून विश्वम वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले. यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली च्या जन्मापूर्वीपासून ते समाधी पर्यंतचा जीवनपट 'जगदमाऊली' या नृत्य नाटिकेच्या स्वरूपात सादर करण्यात आला . यासाठी संत ज्ञानेश्वर मालिकेत ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका करणारे अभिनेते मा. वरूण भागवत अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच विश्वम वर्ल्ड रेकॉर्ड चे आंतरराष्ट्रीय जुरी मेंबर मा. नरेंद्र बिंगी , रेतुरी नागेंद्रम व नागेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शाला समिती अध्यक्ष श्री खेमराज रणपिसे व शाला समिती सदस्य श्री धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रम बघण्यासाठी अनेक माजी मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,अधिकारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रम बघण्यासाठी जवळजवळ 5000 पालक उपस्थित होते. या नृत्य नाटिकेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-बाबांचे देहांत प्रायश्चित , रेड्या मुखी वेद पठण , संत चांगदेव महाराजांचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी चालविलेली भिंत, मुक्ताईच्या इच्छेसाठी ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या पाठीवर भाजलेले मांडे.... हे प्रसंग सादर करण्यात आले. हे प्रसंग बघताना उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. कार्यक्रमाच्या शेवटी संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर सर्व अधिकारी वर्ग भारावून गेले व त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या चरणी फुले अर्पण केली. बालवर्गापासून ते इयत्ता चौथी पर्यंतच्या या छोट्या छोट्या बालकलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांना तेराव्या शतकात नेऊन एक अविस्मरणीय अनुभूती दिली. संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले. या नृत्य नाटिकेसाठी लागणारे सर्व नेपथ्य राजेंद्र गेजगे, ज्योती भोसले, ज्योती निवंगुणे , प्रतिभा पोटघन , शहनाझ हेब्बाळकर व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी शाळेत तयार केले. कार्यक्रमासाठी लाईट व साऊंड ची व्यवस्था शाळेचे माजी विद्यार्थी रत्नाकर व पद्माकर वरवडेकर बंधूंनी केली . संपूर्ण कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण डॉ. विठ्ठल मोरे , व स्वाती बनकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विठ्ठल मोरे यांनी केले. इतर शिक्षकांना ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावरील प्रसंग वाटून देण्यात आले होते. त्यांनी त्या प्रसंगावर आधारित नृत्य नाटिका विद्यार्थ्यांकडून बसवून घेतली होती. या कार्यक्रमात मतीन इनामदार , कियान जमदाडे, वेदिका पवार,सुनीश सिंग, आर्या गाडी लोहार , सिया घोणे , यश पवार या व यांच्याबरोबरच अनेक बाल कलाकारांनी अतिशय सुंदर अभिनय करून महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या व या नृत्य नाटिकेला जिवंत केले. कार्यक्रमाची सुरुवात समीक्षा इसवे व सीमा हांगे यांनी तयारी करून घेतलेल्या नेत्र दीपक अशा पालखी सोहळ्याने झाली .तत्पूर्वी धनश्री पवार , शामला दाभाडे व इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक विभागाच्या बाल चमूंनी चल ग सखे चल ग सखे.... हे गाणे सादर करून सर्वांची मने जिंकून घेतली.यावेळी पालक संघाचे उपाध्यक्ष जितेंद्र बोरनारे व अक्षया संभूस उपस्थित होते तसेच संपूर्ण पालक संघाने यावेळी कार्यक्रमात शिस्त ठेवण्यासाठी मदत केली. कार्यक्रम संपल्यानंतर विश्वम वर्ल्ड रेकॉर्ड च्या जुरी मेंबर नी जगद माऊली कार्यक्रमाची नोंद विश्वम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे हे जाहीर केले. संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष अशोक पालांडे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम संपल्यावर प्रमुख पाहुणे , उपस्थित मान्यवर तसेच पालकांनी मुख्याध्यापकांचे , शिक्षकांचे बालकलाकारांचे खूप खूप कौतुक केले..
वार्तांकन
सौ शहनाझ हेब्बाळक