दिनांक : 19 फेब्रुवारी 2026
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत आज उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित विविध विषय वाटून देण्यात आले होते. यामध्ये छत्रपती शिवरायांची माहिती, पोवाडे, शिवगर्जना,शिवआरती यांचा समावेश होता. या दिवशी इयत्ता पहिलीचा मौर्य पाटील शिवरायांच्या तर स्वरा गजरे जिजाबाईंच्या वेशभूषेत आले होते. समर्थ आव्हाड याने पोवाडा सादर केला. पूर्व प्राथमिकच्या यज्ञेश देवलकर याने शिवगर्जना दिली. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांचा पाळणा... यावर नृत्य सादर केले. पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा यावर नृत्य सादर केले. मा. मुख्याध्यापकांनी मुलांना शिवरायांची गोष्ट सांगितली व शिवरायांकडून मातृभक्ती , निडरपणा व देशभक्ती हे तीन गुण घेण्यास सांगितले. रूपाली जाधव यांना शिवरायांची माहिती सांगितली. पुष्पा राऊत यांनी सूत्रसंचालन केले. इयत्ता पहिली च्या सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाची तयारी केली. ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे डॉ. श्री विठ्ठल मोरे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले .