एच ए स्कूल मध्ये उत्साहात कब बुलबुल शिबिराचे आयोजन !

शिक्षण विवेक    25-Feb-2026
Total Views |
bulbul
दिनांक - 22 फेब्रुवारी 2026
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांची जयंती म्हणजेच चिंतन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. व चिंतन दिनानिमित्त कब बुलबुल चे एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये सर्वप्रथम बडी सलामी व कब ग्रीटिंग ने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कलर पार्टी द्वारे ध्वजारोहण करण्यात आले. समीक्षा इसवे , अनिता येनगुल, अनघा कडू ,अर्चना गोरे यांनी स्काऊट झेंडा गीत , बुलबुल प्रार्थना , बेडन पॉवेल तेरे बच्चे हम ही गाणी सादर केली. अर्चना गोरे यांनी मान्यवरांना कब बुलबुलचा स्कार्फ देऊन स्वागत केले. पुष्पा राऊत यांनी चिंतन दिनाची माहिती सांगितली.मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी गोष्टीतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर मुलांनी गरमागरम उपीट चा आस्वाद घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मागाच्या खुणा शोधत शोधत आपले योग्य ठिकाण गाठले. तसेच बोगद्यातून जाणे , अडथळ्यांची शर्यत , शरीरातून रिंग पास करणे ,तोल सांभाळत चालणे व बादलीत चेंडू टाकणे , दोरीच्या उड्या मारणे , गुडघ्यात चेंडू पकडून चालणे असे साहसी व मनोरंजनात्मक खेळांचा अनुभव घेतला. यानंतर मुलांनी गरमागरम मसालेभात , कोशिंबीर व जिलेबी चा आस्वाद घेतला . यानंतर कब आणि बुलबुल नी रंगभरण , चित्रकला हा उपक्रम पूर्ण केला .त्यानंतर अनघा कडू व रितू राठोड यांनी मुलांना प्रथमोपचाराची माहिती सांगितली व प्रात्यक्षिक दाखवले. यानंतर रेड फ्लावर चा कार्यक्रम झाला. यामध्ये कब आणि बुलबुल नी का डान्स ,भालू डान्स , ताराची गोष्ट व वाघ्या मुरळी हे लोकनृत्य सादर केले. शहनाझ हेब्बाळकर यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना गोरे यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाची तयारी सर्व कब मास्टर आणि फ्लॉक लीडर शिक्षकांनी केली. डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक , इयत्ता तिसरी ,चौथीचे सर्व विद्यार्थी , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अशाप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध उपक्रम , ऍक्टिव्हिटी पूर्ण करत विद्यार्थ्यांनी एक दिवसीय कब बुलबुल शिबिराचा मनमुराद आनंद लुटला.