शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागाचा क्रीडा दिन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे पोलीस आयुक्तालयातील हेड कॉन्स्टेबल व हॉकी खेळाडू श्री गौरव मनोज कांबळे सर उपस्थित होते. प्रशालेचे शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री मिलिंद कांबळे सर या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय सौ. वासंती ताई बनकर, प्रार्थमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री प्रसाद लागू सर, पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय सौ अपर्णाताई साने या कार्यक्रमास उपस्थित होते. खेळ गटातील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक माननीय सौ अपर्णाताई साने यांनी आपल्या प्रास्ताविकातून मुलांमधील सुप्त गुण ओळखून आपण सर्व पालक व शिक्षक मिळून पाल्याचा विकास करूया असे नमूद केले. खेळाद्वारे मुलांच्या पंचकोशांचा विकास चांगला होतो. म्हणून शिक्षणाबरोबरच खेळायलाही तितकेच महत्त्व द्यायला हवे. हे सांगितले.
प्रमुख पाहुणे माननीय श्री गौरव कांबळे सरांनी आभासी खेळांपासून दूर करून मुलांना मैदानावर मनसोक्त खेळू द्या अभ्यासाबरोबर खेळायलाही तितकेच महत्त्व द्यावे असे सांगितले.
अभ्यासाबरोबर खेळातून शिक्षण मिळून मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने विविध खेळ घेतले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रीडा प्रतिज्ञा घेण्यात आली. वरिष्ठ गटातील विद्यार्थ्यांनी स्फूर्ती गीत सादर केले. बनी टमटोलाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे संचलन सादर केले. मुलांनी आनंदाने व उत्साहाने खेळ खेळले. मुलांमध्ये सांघिक भावना जोपासली जावी शिस्त व नियम पाळून व्यायाम करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, भूमी नमस्कार, कवायत,योगासने,मनोरे, लेझीम, महिलांच्या एकत्रित खेळांची प्रात्यक्षिके मुलांनी लीलया सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. धनश्रीताई जोशी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाला पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास मार्गदर्शन व नियोजन प्रशालेच्या मुख्याध्यापक माननीय सौ अपर्णाताई साने यांनी केले होते. कार्यक्रम नियोजनबद्ध यशस्वीरित्या उत्साहात संपन्न झाला.