म. ए. सो. कलावर्धिनी आयोजित स्वरवेध लोकगीत गायन स्पर्धा दिनांक २३ आणि २४ फेब्रुवारी २०२६ रोजी भावे प्राथमिक शाळा सभागृह सदाशिव पेठ या अतिशय जोशात आणि उत्साहाच्या वातावरणात ठिकाणी संपन्न झाली.
दिनांक २३ फेब्रुवारी रोजी प्रमुख पाहुणे मा. आरती कुंडलकर (सुप्रसिद्ध गायिका) आणि मा. सुयोग कुंडलकर (सुप्रसिद्ध संवादिनी वादक ), मा. आनंदी पाटील, (उपाध्यक्षा म. ए. सो. नियामक मंडळ), कलावर्धिनीचे अध्यक्ष मा. डॉ. दिलीप शेठ सर, कलावर्धिनीचे महामात्र मा.डॉ. गोविंद कुलकर्णी सर यांच्या हस्ते स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
म. ए. सो. च्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन वर्गापर्यंत तीन गटात ही स्पर्धा संपन्न झाली.
पोवाडा, किर्तन, गोंधळ, भारुड या चार कलाप्रकारांचे या स्पर्धेमध्ये सादरीकरण करण्यात आले.
यापैकी म. ए. सो. सौ विमलाबाई गरवारेच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी बाजीप्रभू देशपांडे या विषयावर आधारित पोवाडा सादर केला तर इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींनी भारुड सादर केले .
दिनांक २४ फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास संस्थेचे प्रमुख पाहुणे शाहीर हेमंत राजे मावळे आणि संतोष मोरे यांच्यासह संस्थेचे मा.अध्यक्ष बाबासाहेब शिंदे सहसचिव मा. सुधीर भोसले सर, कलावर्धिनीचे अध्यक्ष मा. दिलीप शेठ सर, कलावर्धिनीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी सर, सर्व प्रशालेचे सन्माननीय पदाधिकारी,
कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की उच्च प्राथमिक गटामध्ये म. ए. सो. सौ विमलाबाई गरवारे प्रशालेस प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि परीक्षक मा. शाहीर हेमंत राजे मावळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात यशवर्धन सोलंकर या विद्यार्थ्याने हे बक्षीस स्वीकारले परंतु पूर्ण सहभागी विद्यार्थ्यांचा या यशामध्ये निश्चितच सिंहाचा वाटा आहे.
या पोवाड्यास प्रशालेतील जूनियर कॉलेज विभागातील शिक्षिका रूपाली देशपांडे मॅडम, देशपांडे स्वप्नाली आणि संगीत शिक्षक श्रीराम पोतदार सर यांनी मार्गदर्शन केले आहे. याच प्रकारे पोवाड्याचे सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी तयारी करून देण्यासाठी पालक वर्गाचे खूप मोलाचे सहकार्य लाभले.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेस उपस्थित राहण्यापासून ते सादरीकरणापर्यंत वेळोवेळी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री भारमळ सर, मा. उपमुख्याध्यापिका सुनिता गायकवाड मॅडम, मा. पर्यवेक्षिका जयश्री शिंदे मॅडम यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.