मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित बक्षिस वितरण समारंभ संपन्न...

शिक्षण विवेक    28-Feb-2026
Total Views |

shikshanvivek
काल शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त शिक्षणविवेक आयोजित सांगू का गोष्ट स्पर्धा २०२६, पुस्तक परीक्षण सादरीकरण स्पर्धा आणि महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६ या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात ४ ते ६.३० या वेळेत संपन्न झाला. शिक्षणविवेक निर्मित 'स... संविधानाचा' या नाटकाचा प्रयोग होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे सत्कार आणि परिचय करण्यात आला. या कार्यक्रमाला सांगू का गोष्ट स्पर्धेचे परीक्षक शारदा पानगे, शीतल इंगुळकर, पुस्तक परीक्षण सादरीकरण स्पर्धेचे परीक्षक वलय मुळगुंद आणि देवेंद्र भिडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शारदा पानगे यांनी मुलांना गोष्ट सांगून स्पर्धेचे महत्त्व सांगितले. त्यानंतर शीतल इंगुळकर यांनी स्पर्धेचे परीक्षण करताना लक्षात आलेल्या बाबी सांगून मुलांना मार्गदर्शन केले. वलय मुळगुंद यांनी पुस्तक परीक्षण सादरीकरण करताना मुलांनी काय केले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच या अभिनव स्पर्धेचे कौतुकही केले. परीक्षकांच्या मनोगतानंतर बक्षीस वितरण सुरू झाले. पुस्तक परीक्षण सादरीकरण, महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सांगू का गोष्ट स्पर्धा या क्रमाने बक्षीस वितरण करण्यात आले. अशाप्रकारे मराठी भाषा गौरवदिनानिमित्त आयोजित बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.