संस्कृतिका या संस्कृत भाषा प्रयोगशाळेस भेट

संस्कृतिका या संस्कृत भाषा प्रयोगशाळेस भेट

शिक्षण विवेक    03-Feb-2026
Total Views |
 
संस्कृतिका या संस्कृत भाषा प्रयोगशाळेस भेट
दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीद्वारे संचलित पुणे स्थित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधील इ.आठवी व नववीचे विद्यार्थी व शिक्षक यांनी शिक्षण मंडळ कराड संचलित संस्कृतिका या संस्कृत भाषा प्रयोगशाळेस भेट दिली.
या वेळी त्यांनी संस्कृतिका तयार करण्यामागची पार्श्वभूमी, संस्कृतचे आधुनिक काळातील महत्त्व व इथे चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्प व उपक्रमांची माहिती घेतली. या प्रसंगी स्व.शेठ रामविलास कि.लाहोटी कन्या प्रशाला, कराड येथील संस्कृत विभागप्रमुख व संस्कृतिका समन्वय माधुरी कुलकर्णी व इंग्रजी माध्यमाचे विद्यालय, कराड येथील संस्कृत शिक्षक विनीत देसाई यांनी मार्गदर्शन केले. तसेच कृष्णाकाठ या टेक्निकल इन्स्टिट्यूट चे संचालक एस. के. कुलकर्णी यांनी संस्थेबद्दल व कृष्णाकाठबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध कक्ष पाहिले त्याबद्दल अनेक शंका विचारल्या त्याचबरोबर संस्कृत शिक्षिका निरजा बेलसरे आणि अक्षदा इनामदार या दोन संस्कृत शिक्षकांनीसुद्धा येथे चालणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली . इथे असणाऱ्या खेळांचा वापरकरून पुस्तकातील घटक कशाप्रकारे शिकता येतात याची प्रात्यक्षिके घेण्यात आली .विद्यार्थ्यांनी खूप छान हे खेळ हाताळले .
ही प्रयोगशाळा पाहून मुलांच्या संस्कृतमधील प्रश्न व शंकांचे समाधान करून घेतले.
या भाषा प्रयोगशाळेमध्ये काय बघितले आणि विद्यार्थ्यांना काय मिळाले यासंबंधी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली . दोन मिनिटात हस्तलिखित भगवद्गीता हा उपक्रम सर्वच विद्यार्थ्यांना खूप भावला .
भविष्यात अशा प्रकारची भाषा प्रयोगशाळा न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पुणे येथेदेखील उभे करण्याचा मानस शिक्षक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. शेवटी समन्वयिका माधुरी कुलकर्णी यांनी शिक्षण मंडळ कराड व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले .