आंतरराष्ट्रीय पाय दिवस रमणबाग प्रशालेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा

शिक्षण विवेक    16-Mar-2026
Total Views |

pi diwas
      आंतरराष्ट्रीय पाय दिवसानिमित्त रमणबाग प्रशालेमध्ये विविध गणित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. द्रविड हायस्कूल वाईचे निवृत्त मुख्याध्यापक व गणित शिक्षक नागेश मोने यांनी सर्व गणित शिक्षकांची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेमध्ये त्यांनी तयार केलेल्या पाय दिन विशेष कार्यपत्रिकेबद्दल मार्गदर्शन केले. गणित शिक्षकांनी या मार्गदर्शनानुसार सर्व वर्गांमध्ये या कृती करुन घेतल्या. या घडीपत्रकासाठी भास्कराचार्य प्रतिष्ठान पुणे यांचे अर्थसाह्य लाभले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा माने यांनी आपल्या प्रास्ताविकातून या उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले.
दिपाली सावंत यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करुन दिला. गणित विषय प्रमुख योगेश पडदुणे यांनी पाय दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी या पुस्तिकेतील विविध कृती उत्साहाने पूर्ण केल्या. प्रशालेच्या फरसबंद चौकात पायच्या आकारात मानवी आकृती मांडण्यात आली होती. दीप्ती डोळे तसेच सर्व गणित शिक्षकांनी यासाठी सहकार्य केले.
      शालासमिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर, उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर, गणित विभाग प्रमुख प्रतिभा वडनेरकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.