
आज दि. १४ मार्च २०२६ विवेकानंद संकुल सानपाडा येथे प्री प्रायमरी इंग्रजी माध्यम विभागाचा आजी-आजोबा सत्कार सोहळा मुख्याध्यापिका वनिता बनगर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
संकुलामध्ये आजी आजोबांचे स्वागत औक्षण आणि फुलांचा वर्षाव करून करण्यात आले.
आजी आजोबांच्या चरणांची पूजा नातवंडांनी हळद- कुंकू, अक्षता, फुल वाहून केली आणि त्यांना गोड खाऊ भरवला.
या सत्कार सोहळ्यासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्या राधा गाणू मॅडम यांचे स्वागत मुख्याध्यापिका वनिता बनगर मॅडम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ,शाल, श्रीफळ देऊन करण्यात आले. सौ. राधा मॅडम स्वतः एक आजी असल्यामुळे आजी आजोबांशी जुन्या आठवणींना उजाळा देऊन संवाद साधला. अनेक पारंपारिक गोष्टी, कविता यामधून आपल्या नातवंडांवर कशा प्रकारे संस्कार होतील,
फास्ट फूड न खाता आजीने मायेने बनवलेले पारंपारिक पदार्थ मुलांनी खाल्ले पाहिजेत
तसेच मुलांना हसत खेळत पाढे कसे येतील याचे सुद्धा मार्गदर्शन केले. बाल गोपाळांच्या आवडीच्या चांदोमामा चे गाणे चिऊ काऊची गोष्ट याचा इतिहास देखील त्यांनी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आजी-आजोबांचा सत्कार शाल, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि छोटीशी भेटवस्तू देऊन करण्यात आला.
आजी आजोबांनी त्यांचे मनोगत सर्वांसमोर व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन झाल्यानंतर सर्व आजी आजोबा पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वर्गात आकाशगंगा या गाण्यावर ठेका धरून नृत्य केले. त्यानंतर काहीसे भाऊक झालेल्या चेहऱ्यांवर पुन्हा एकदा एक सुंदर हसू उमटले.
हा सत्कार सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्री प्रायमरी इंग्रजी माध्यमाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.