एच .ए.स्कूल प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

शिक्षण विवेक    18-Mar-2026
Total Views |
 
 
des
दिनांक १७ मार्च २०२६ 
      डेक्कन एज्युकेशन संस्थेद्वारा संचालित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेचा 68 वा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या इमारतीला फुगे , झिरमिळ्या लावून सजविण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल सेंट हायस्कूल खडकी व केंद्रीय विद्यालय येथील सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक आनंद बेंजामिन गोविंद सर ,एम एस सी बी एड असलेले उपस्थित होते. इयत्ता तिसरी चौथीच्या ढोलताशा लेझीम पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले .प्रमुख पाहुणे बेंजामिन सर ,शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ. श्री विठ्ठल मोरे यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे पूजन करण्यात आले . सरस्वती पूजन , दीप प्रज्वलन व गीत मंचाच्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बालवाडी पासून चौथीपर्यंतच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांची वैयक्तिक कला सादर केली. यामध्ये रक्षा अंबाडे पेटीवर अभंग ,सौजन्या हेळवार भरत नाट्यम , श्री आव्हाड पेटीवर भूप राग गायन, विराज उंडे अबॅकस , श्रबणी पात्रा नृत्य , प्रगती साबळे मोक्षाली गिरी कराटे प्रात्यक्षिक, श्रुतिका लांडगे नाट्यछटा, आभा आगवणे , सौम्या वाघमारे शास्त्रीय नृत्य , शिवम मोरे यांनी नृत्य सादर केले. स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून एच. ए. जीनियस ही परीक्षा घेतली जाते त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले . जीवनात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कष्ट करत राहा, कष्टाशिवाय कोणतीही यश मिळत नाही , सतत काहीतरी नवीन शिकत रहा असा संदेश प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून दिला .तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना स्मृती पारितोषिके देण्यात आली. याबरोबरच आनंदाची शाळा आमुची...... हे समीक्षा इसवे यांनी लिहिलेले गाणे अनिता येनगुल , समीक्षा इसवे ,अनघा कडू यांनी गायले. या गाण्यातून शाळेत घेतले जाणारे विविध उपक्रम व शाळेची गुणवैशिष्ट्ये सांगण्यात आली. यासाठी रत्नाकर वरवडेकर यांनी संगीताची साथ दिली.शहनाझ हेब्बाळकर आणि सीमा हांगे यांनी सूत्रसंचालन केले , डॉक्टर विठ्ठल मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अर्चना गोरे यांनी आभार मानले . शाळेतील सर्व मुलांना यावेळी केक देण्यात आला.