रमणबाग प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त साकारली भव्य वैज्ञानिक प्रतिकृती

शिक्षण विवेक    02-Mar-2026
Total Views |

vidnyan din
   शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ISRO,DRDO,IISER,
IUCAA,BARC,IIT, NIV,NCL,IMD अशा वैज्ञानिक संस्थांच्या देशाप्रती असणाऱ्या योगदानास सलाम करण्यासाठी वैज्ञानिक आकृत्यांमधून भव्य प्रतिकृती साकारण्यात आली.ही प्रतिकृती दीप्ती डोळे आणि सर्व विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तयार केली.संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाने संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत सादर केले.प्रशालेच्या शालाप्रमुख आशा माने यांनी देशाला आत्मनिर्भर व प्रगत करण्यासाठी वैज्ञानिक संशोधनाची भूमिका महत्वाची आहे असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले.प्रमुख अतिथींचा परिचय हेमंत पाठक यांनी करून दिला. डॉ.सुशील धनमने हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
अवयवदान काळाची गरज' या विषयक विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी विवेक ताटके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
विज्ञान दिनाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये विज्ञान सप्ताह साजरा झाला. विद्यार्थ्यांसाठी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे,बॅजेस स्पर्धा,विज्ञान प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, कार्डशीट रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञानदिनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली.सारिका रणदिवे यांनी बक्षिसपात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी देशपांडे यांनी केले तर विज्ञान विभाग प्रमुख प्रतिभा जक्का यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपमुख्याध्यापक महेश जोशी,पर्यवेक्षिका अंजली गोरे, मंजूषा शेलुकर यांच्या मार्गदर्शनाने सर्व विज्ञान शिक्षकांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.