पुणे : पुणे मराठी ग्रंथालय आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या वतीने शालेय गट सुलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत डी. ई. एस. सेकंडरी शाळेतील इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी अक्षरा शैलेश जोशी हिला प्रथम क्रमांक मिळाला. जिल्हास्तरीय सुलेखन स्पर्धेसाठी एकूण पाचशे विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात अक्षरा जोशी हिला प्रथम क्रमांक मिळाला. डी. ई. एस. सेकंडरी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी तिचे कौतुक अभिनंदन केले. यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.