"शास्त्रज्ञांनी दिली शाबासकीची थाप"

एन.ई.एम.एस शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

शिक्षण विवेक    04-Mar-2026
Total Views |
 
"शास्त्रज्ञांनी दिली शाबासकीची थाप"
पुणे: दि.२८ फेब्रुवारी रोजी शनिवार पेठेतील एन.ई.एम.एस शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांच्यासह शास्त्रज्ञ डॉ. हिमांशू शेखर, 'जी' आणि हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी (HEMRL), डीआरडीओ पुणे येथील गट संचालक आणि जिओमॉर्फोलॉजी संशोधक डॉ. श्रीकांत गबाले यांच्या हस्ते करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता ५ वी ते ७ वीमधील विद्यार्थ्यांनी मानवी मेंदू आणि मानसशास्त्र, मेंदूची स्मरणशक्ती,रंग सिद्धांत, संगीताचा मेंदूवर होणारा परिणाम,अन्नशास्त्र, पोषणतत्त्वांचे महत्त्व, खाद्यपदार्थ वरील लेबलचे महत्त्व ,पर्यावरण संवर्धनाची त्रिसूत्री म्हणजे कचरा कमी करणे (Reduce),वस्तूंचा पुनर्वापर करणे (Reuse) आणि टाकून दिलेल्या वस्तूंपासून नवीन वस्तू तयार करणे (Recycle) इत्यादी विषयावर प्रकल्प सादर केले. आलेल्या प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयांचे विशेष कौतुक केले. असेच विविध प्रयोग करत राहा. विज्ञान समजून घेतले तर कोणतीही गोष्ट अवघड वाटत नाही असे सांगत इतरांशी तुलना न करता स्वतःशीच स्पर्धा करा असा महत्वाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शाह व नवज्योत मित्र मंडळाचे अध्यक्ष अमित जाधव , डी.आर.डी.ओ.चे डॉ हिमांशू आणि जिओमॉर्फोलॉजी डॉ. श्रीकांत गबाले यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट प्रकल्पांसाठी विजेत्यांना सन्मानपत्र व मेडल्स देऊन गौरविण्यात आले.पीयूष शाह यांनी पाहुण्याची ओळख करून दिली. प्रसंगी दोन्ही शास्त्रज्ञांनी बोलताना विज्ञान शिक्षिका रोहिणी मराठे, शिवानी फडके, वरदा फाटक, गौरी जोगळेकर यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. विज्ञान प्रदर्शनास शाळेतील पालकांनी देखील उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांनी प्रास्ताविक केले व शिक्षिका शिवानी फडके यांनी आभार मानले.