राष्ट्रीय विज्ञान दिन – संक्षिप्त अहवाल

शिक्षण विवेक    06-Mar-2026
Total Views |

mes
   म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत दिनांक २१ ते २७ फेब्रुवारी २०२६  या कालावधीत विज्ञान सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व मूल्ये रुजावीत या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. 
   इयत्ता पाचवीसाठी विज्ञान कोडे, सहावी व सातवीसाठी वैज्ञानिक मेहंदी व चित्रकला स्पर्धा, तर आठवीच्या विद्यार्थ्यांनी सर्व विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा व प्रयोग सादर केले. नववीसाठी प्रश्नमंजुषा, स्वरूपवर्धिनीची फिरती प्रयोगशाळा, रोबोटिक प्रयोग व सायकल म्युझियम क्षेत्रभेट असे उपक्रम घेण्यात आले.
   शनिवार दिनांक २८\०२\२०२६ रोजी विज्ञान दिनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. विजय फडके हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात विज्ञान गीत सादरीकरण, प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत झाले. आठवडाभरातील स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
   प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अभंगाच्या गायनातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन टिळेकर मॅडम यांनी केले. सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी गणित-विज्ञान शिक्षकांचे सहकार्य व प्रशालेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.