शिक्षण प्रसारक मंडळीच्या ,मराठी माध्यम,निगडी शाळेत "मराठी भाषा गौरव दिन" उत्साहात संपन्न

शिक्षण विवेक    06-Mar-2026
Total Views |

spm
   दि. २७ फेब्रुवारी २०२६ वार : शुक्रवार रोजी "मराठी भाषा गौरव दिन" शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
   कार्यक्रमाची सुरवात मा. मुख्याध्यापिका सौ. सविता बिराजदार यांनी सरस्वती पूजन व ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
आजच्या दिनाचे औचित्य साधून शाळेतील नर्सरी ते इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान वाटेल असे नृत्य, शेतकरी गीत, मुळाक्षरांची कविता, ती फुलराणी नाट्य वाचन , मराठी साहित्य प्रकारांची ओळख असे विविध कार्यक्रमाचे सादरीकरण केली. शाळेतील शिक्षिका सौ. कांचन केंडे व विद्यार्थिनी अनुष्का देशमुख यांनी मराठी भाषा गौरव दिनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका ललिता चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
   शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागातून कार्यक्रम संपन्न झाला.