नवीन मराठी शाळेत वार्षिक क्रीडास्पर्धा बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न

शिक्षण विवेक    07-Mar-2026
Total Views |

des
   पुणे : शनिवार दि. ६/०३/२०२६ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धांचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. रमणबाग मित्र मंडळाचे सरचिटणीस अमरनाथ चक्रदेव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव, माजी मुख्याध्यापिका कल्पना वाघ, कराटे प्रशिक्षक दिनेश भुजबळ , निलम जव्हेरी , रमणबाग मित्र मंडळ चे संदीप ठाकूर देसाई, मंगेश गावडे, महेश कदम रमणबाग मित्र मंडळ लंगडी असोशियन चे सदस्य उमेश शिंदे व ओंकार शिंदे पालक संघाचे अध्यक्ष प्रणव जोशी सर उपस्थित होते.
   शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. डेरवण येथे झालेल्या लंगडी स्पर्धेत विजेते पद मिळवणाऱ्या शाळेच्या खेळाडूंच्या हस्ते क्रीडाजोत फिरवण्यात आली.
   मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना, "स्वतःचे शरीर व मनाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी करा व मैदानावर जास्तीत जास्त खेळा." असा संदेश दिला. बक्षीस वितरणाच्या सुरुवातीला Ideal Taekwondo KKB Academy च्या वतीने निरा येथे कराटे क्षेत्रातील जास्तीत जास्त पंचेस चे वर्ड रेकॉर्ड करणे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवीन मराठी शाळेचा विशेष सन्मान करण्यात आला होता ती ट्रॉफी शाळेला सुपूर्द करण्यात आली.
   वार्षिक क्रीडा महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल्स व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक वर्गातील २ सर्वोत्तम विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.१९७६ च्या बॅच चे माजी विद्यार्थी USA स्थित आनंद चौथाई यांनी त्यांच्या मातोश्री कैलासवासी शामला शशिकांत चौथाई यांच्या स्मृती प्रित्यर्थ सर्व मेडल्सचे प्रायोजकत्व स्वीकारले त्यासाठी १९७६ च्याच बॅचचे माजी विद्यार्थी मनोज मुनोत यांनी सहकार्य केले.
   शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या निमिष करडे या जलतरण क्षेत्रात्र राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. डेरवन येथे झालेल्या लंगडी स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. प्रमुख पाहुणे अमरनाथ चक्रदेव यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून सांगितले की," डेक्कन एज्युकेशन सोसायटीची परंपरा आहे की कोणतेही काम करताना ते आपल्या फायद्यासाठी न करता समाजाच्या हितासाठी करायचे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे, त्यामुळे भरपूर व्यायाम करा त्याबरोबर अभ्यासही करा.शरीर स्वस्थ ठेवा."
शिक्षिका अर्चना देव यांनी सूत्रसंचालन व अतिथी परिचय करून दिला. भाग्यश्री हजारे यांनी आभार मानले. ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे , योगिता भावकर , अश्विनी राजवाडे, सुषमा घडशी,प्रकाश राऊत यांनी आयोजन सहाय्य केले.