शिक्षणविवेक अंक प्रकाशन

शिक्षणविवेक    08-May-2026
Total Views |

अंक प्रकाशन  
आज दिनांक १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय,उदगीर येथे हे महिन्याच्या शिक्षणविवेक मासिक अंकाचे विमोचन शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी माजी प्रचारक व ज्येष्ठ स्वयंसेवक प्रमोदजी कुलकर्णी,शालेय समिती सदस्य बालाजी चटलावार,अर्थ समिती अध्यक्ष गजानन जगळपुरे,मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी तसेच माजी विद्यार्थी संतोष जिरोबे व डॉ.सुनिल गरड उपस्थित होते.
मे महिन्याच्या अंकात इयत्ता तिसरी तुकडी -ड वर्गातील कु. स्वरा शिवशंकर मुळे हिचे चित्र छापून आले. त्याबद्दल मान्यवर पाहुण्यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले.
या मासिकामध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता,कथा,चित्रकला व विविध शैक्षणिक उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून साकारलेले हे मासिक सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.