पुणे, सोमवार, १५ जून २०२६
न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, शनिवार पेठ, पुणे.
शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळ व दुपार विभागाच्या मुलांचे ढोल-ताशांच्या गजरात मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख यांनी औक्षण करून शाळेत स्वागत केले.
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शाळेच्या कला शिक्षिकांनी विद्यार्थी विकास यावर आधारित चित्र संदेश देणारी सजावट केली होती.
सनईचे सूर, फुला-पाकळ्यांचा वर्षाव, अशा मंगलमय वातावरणात शाळेची पहिली पायरी आणि सरस्वती देवीला वंदन करत भारतीय परंपरा व मूल्यांची जपणूक करून मुख्याध्यापकांनी व सर्व शिक्षकांनी अतिशय उत्साहात मुलांचे स्वागत केले.